युवाशक्तीचा जल्लोष! ‘युवाशक्ती जागर यात्रा’चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भव्य शुभारंभ

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित ‘युवाशक्ती जागर यात्रा’ महाराष्ट्र दौऱ्याचा शुभारंभ सोहळा राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. रवींद्रजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आज करण्यात आला. भाजपाचा झेंडा दाखवून युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वात युवा मोर्चाच्या राज्य दौऱ्याचा प्रारंभ झाला. यावेळी उपस्थित युवा मोर्चाच्या महाराष्ट्र दौऱ्याला शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी मंत्री अतुल सावे, जयकुमार गोरे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार धनंजय महाडिक, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार विक्रांत पाटील, प्रवक्ते नवनाथ बन व इतर आमदार पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.