मुंबई हादरली! महिलांची फसवणूक करून अत्याचार, भोंदूबाबाला अटक

नाशिकसह संगमनेरमधील भोंदूबाबाची प्रकरणे ताजी असतानाच मुंबईत देखील भोंदूबाबचं एक प्रकरण समोर आलं आहे. मुंबईत एका भोंदूबाबा फकीराला अटक करण्यात आली आहे. महिलांना बेशुद्ध करुन अत्याचार करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. भोंदू फकीर इरफान नियाज अहमद (वय 34) असं अटक करण्यात आलेल्या भोंदूचे नाव आहे.

आरोपी मूळचा बहराइच (उत्तर प्रदेश), अनेक वर्षांपासून मुंबईत वास्तव करत होता. स्वतःला फकीर बाबा म्हणवत महिलांची फसवणूक करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. महिलांच्या समस्या जाणून उपचार आणि दोष निवारणच्या नावाखाली जाळ्यात अडकवत होता. कांदिवलीतील एका महिलेची फसवणूक झाली आहे. पतीच्या मृत्यूचा मुद्दा सांगून विश्वास संपादन केला होता. त्यानंतर महिलेसह दोन मुलींवर कथित धार्मिक विधी केला, तसेच तिघींनाही बेशुद्ध केल्याचा आरोप करण्यात आला आहे. बेशुद्ध अवस्थेत एका मुलीचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. घटनेनंतर कांदिवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 74, 78, 123 तसेच 3(2) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.

हा फकीरबाबा महिलांना त्यांच्या समस्या सांगून उपचाराच्या नावाखाली आधी बेशुद्ध करायचा आणि नंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचा असा आरोप करण्यात आला आहे. फकीर बाबाचे नाव इरफान नियाज अहमद आहे. ज्यांचे वय 34 वर्षे आहे, तो मूळचा बहराइच, उत्तर प्रदेशचा आहे. पण तो गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत राहत असून स्वतःला फकीर बाबा म्हणवतो आणि उपचाराच्या नावाखाली महिलांचा विनयभंग करतो. या फकीराने कांदिवलीत राहणाऱ्या एका स्त्रीला स्वतःची बाबा म्हणून ओळख करून दिली आणि म्हणाला, मला माहित आहे की तुमचे पती आता या जगात नाहीत. आणि तुझ्यावर दोष आहे, आणि हा दोष दूर करण्यासाठी एक पद्धत अवलंबावी लागेल. त्यानंतर बाबांनी त्या स्त्री आणि तिच्या दोन मुलींसोबत विधी करायला सुरुवात केली, ज्यामध्ये तिघीही बेशुद्ध पडल्या. त्यानंतर फकिराने एका मुलीचा विनयभंग केला आहे.