मंत्री नितेश राणे यांनी श्री पार्श्वनाथ श्वेतांबर मूर्तीपूजक जैन संघाच्या ५७६ व्या सामूहिक वर्षीतप पारणोत्सव कार्यक्रमाला आज घाटकोपर येथे उपस्थित राहण्याचा योग आला. या प्रसंगी वर्षभर कठोर उपवास करणाऱ्या साधकांच्या पवित्र पाळणा विधीत सहभागी होत, त्यांना विधीपूर्वक जल प्राशन करण्यास देऊन उपवास सोडण्याचा अत्यंत भावनिक आणि पुण्यदायी क्षण अनुभवता आला. या कार्यक्रमात साधकांच्या तपश्चर्येचा सन्मान, श्रद्धा, संयम आणि आत्मशुद्धीचा हा अद्वितीय गौरव सोहळा आत्मिक समाधान देणारा ठरला !












