आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्य लाभावे म्हणून कार्यकर्त्यांनी श्री देव कुणकेश्वर येथे केला अभिषेक

देवगड ; शिवसेना कुडाळ–मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड तालुक्यातील पवित्र तीर्थक्षेत्र कुणकेश्वर येथे शिवसेना कार्यकर्त्यांकडून श्री देव कुणकेश्वर मंदिरात विधीवत अभिषेक करण्यात आला.
यावेळी आमदार निलेश राणे यांना दीर्घायुष्य लाभावे, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात तसेच त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्यात यश लाभावे, अशी मनोभावे प्रार्थना करण्यात आली. या धार्मिक कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

या कार्यक्रमास देवगड तालुका शिवसेना तालुकाप्रमुख तथा देवगड पंचायत समितीचे उपसभापती अमोल लोके, कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली, कुणकेश्वर सरपंच महेश ताम्हणकर, तुषार गावकर, अण्णा चव्हाण, प्रमोद आंबेरकर, ऋषी चव्हाण, नानेरकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.