केळूस-कालवीबंदर येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात साजरा होणार भव्य ‘श्री रामनवमी महोत्सव २०२६’

वेंगुर्ले:-नवतरुण उत्साही कला क्रीडा मंडळ, केळूस-कालवीबंदर या मंडळाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘श्री रामनवमी महोत्सव २०२६’ आणि ‘२२ व्या सामाजिक नाट्य स्पर्धेचे’ भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव गुरुवार, दि. १९ मार्च ते गुरुवार, दि. २६ मार्च २०२६ या कालावधीत ‘श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, कालवीबंदर’ येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. तर मुख्य रामनवमी उत्सव हा २६ रोजी श्री. विठ्ठल रखुमाई मंदिरात साजरा होणार असून, दुपारी १२.०० वाजता ‘श्रीरामजन्म’ सोहळा व पाळणा व त्यानंतर तीर्थप्रसाद व महाप्रसाद होणार आहे. तर सलग आठ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात धार्मिक विधी, सुश्राव्य कीर्तने, भजने आणि दर्जेदार नाटकांची मोठी मेजवानी रसिक व भाविकांना मिळणार आहे.


दैनंदिन धार्मिक कार्यक्रम
महोत्सवादरम्यान दररोज पहाटे श्रींची षोडशोपचार पूजा, एकादशणी, आरती व तीर्थप्रसाद होईल. दुपारी ग्रंथवाचन, सायंकाळी हरिपाठ आणि रात्री ९.०० ते १०.०० या वेळेत ग्रामस्थांचे भजन पार पडणार आहे.
२२ व्या सामाजिक नाट्य स्पर्धेचे आकर्षण व बक्षिसे
यंदा या नाट्य स्पर्धेचे २२ वे वर्ष असून, विजेत्या संघांसाठी रोख रकमेसह कायमस्वरूपी चषकांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम क्रमांक: रु. २०,०००/- व चषक (कै. हरि ज्ञानदेव पराडकर व कै. श्रीमती हरि पराडकर यांच्या स्मरणार्थ श्री. मिलिंद हरि पराडकर यांच्याकडून), द्वितीय क्रमांकः रु. १५,०००/- व चषक (मा. श्री. नितेश सामंत- माजी सभापती जि.प. सिंधुदुर्ग यांच्याकडून), तृतीय क्रमांक: रु. १०,०००/- व चषक (श्री. रवींद्र श्रीकृष्ण आचरेकर व सागर सम्राट श्री. राजन केरूळकर यांच्याकडून), याशिवाय ‘एक नाट्य रसिक आणि मंडळातर्फे’ वैयक्तिक बक्षिसेही दिली जाणार आहेत.

नाट्य स्पर्धेचे वेळापत्रक (दररोज रात्री १०.०० वाजता):
१९ मार्च:- ‘दुरीतांचे तिमिर जावो’ (श्री रवळनाथ प्रासादिक अंतर्गत श्रींची इच्छा कला मंच, तेंडोली)
२० मार्च:-‘ओळख मोठा शहाणा’ (रेन्बो फ्रेंड सर्कल, कवठणी, ता. सावंतवाडी)
२१ मार्च:- ‘बायको शिवाय खरा नाय’ (श्री साईकृपा मंच, कलमठ, कणकवली)
२२ मार्च:- ‘सारे तुच वाटे’ (शिवगौरी नंदन थिएटर, नेरुर)
२३ मार्चः ‘घनअंधश्रुती येती’ (श्री देवी सातेरी प्रासादिक तरुण नाट्य कला क्रीडा मंडळ, कवठी)
२४ मार्च:- ‘मेला तो शेवटचा होता’ (इंद्रधनु कलामंच, दाभोली)


नामवंत कीर्तनकार आणि भजनांची पर्वणी
महोत्सवात दररोज दुपारी व सायंकाळी सुश्राव्य कीर्तने व भजनांचे कार्यक्रम होतील. यामध्ये ह.भ.प. स्नेहल बुवा सामंत (वालावल), ह.भ.प. सदाशिव पाटील बुवा (आंदुर्ले), श्री. मकरंद देसाई बुवा (तेंडोली) यांची कीर्तने होतील. तसेच पावशी, केळूस, परुळे, आंदुर्ले, सुपाणी, मोबाडी, कुडाळवाडी आणि वेंगुर्ला येथील विविध प्रासादिक भजन मंडळे आणि ‘श्री देव दादोबा होरी महिला फुगडी ग्रुप’ (२३ मार्च, सायं. ५ वा.) यांची सेवा रुजू होईल.


मुख्य रामनवमी उत्सव (२५ व २६ मार्च)
बुधवार, २५ मार्चः- सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत ‘अखंड श्री विठ्ठल नाम जप’ होईल. रात्री १२.०० वाजता हनुमान जन्मोत्सव आणि त्यानंतर श्रींची पालखीतून मिरवणूक काढण्यात येईल.

गुरुवार, २६ मार्चः- (श्री रामनवमी मुख्य दिवस), सकाळी ७ ते १० ओटी भरण्याचा कार्यक्रम. सकाळी १० ते १२ः ह.भ.प. श्री उत्तम बुवा केळुसकर यांचे ‘श्रीराम जन्मावर आधारित वारकरी कीर्तन’, दुपारी १२.०० वाजता ‘श्रीरामजन्म’ सोहळा व पाळणा. त्यानंतर तीर्थप्रसाद व महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता नाट्य स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते पार पडेल. रात्री ८ ते १०.३० ग्रामस्थांचे भजन व पालखी सोहळा होईल. त्यानंतर रात्री १०.३० वाजता सावर्डेकर दशावतार नाट्यमंडळ, आंबेळ यांचा “कानडा विठ्ठलु कर्नाटकु” हा महान दशावतारी नाट्यप्रयोग सादर होईल. पहाटे काकड आरतीने या भव्य महोत्सवाची सांगता होईल. या सर्व धार्मिक, सांस्कृतिक व नाट्य स्पर्धांच्या कार्यक्रमांचा लाभ परिसरातील सर्व भाविक आणि कलाप्रेमींनी बहुसंख्येने घ्यावा, असे आवाहन ‘नवतरुण उत्साही कला क्रीडा मंडळ, केळूस-कालवीबंदर’ आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.