मंत्री नितेश राणेंच्या हस्ते वागदे येथील कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्ष प्रवेश ; उबाठा गटाला धक्का

कणकवली तालुक्यातील वागदे येथील उबाठा गटाचे ग्रामपंचायत सदस्य श्री.दशरथ गावडे, माजी शाखा प्रमुख श्री.रवी गावडे व संतोष घाडीगावकर, मनोज गावडे, शांताराम गावडे, अनंत गावडे, बालकृष्ण, राजू गावडे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी यांनी आज भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. पक्षप्रवेश केलेल्या सर्वांचे भाजपाच्या वतीने स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सरपंच संदीप सावंत, लक्ष्मण घाडीगावकर, समीर प्रभूगावकर, गोविंद घाडीगावकर, भाई काणेकर आदी उपस्थित होते.