शिरगाव येथील चेकपोस्ट येथे सापडलेल्या सुमारे 68,000/- रुपयांच्या गुटखा वाहतूक प्रकारणातील आरोपीस जमीन मंजूर.

ॲड. गिरीश भिडे यांचा यशस्वी युक्तीवाद

देवगड : शिरगांव येथे दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी “अक्कलकोट ते देवगड” अश्या येणाऱ्या बस मध्ये एकूण रक्कम रुपये 68,000/- चा गुटखा देवगड पोलिसांकडून जप्त करण्यात आला होता. सदरचे गुन्हाचे कामी देवगड पोलिसांनी संशयीत आरोपी संदेश चंद्रकांत धुरी, दाभोळे यास दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी अटक केली होती. या आरोपीस दिनांक 06/01/2025 रोजी आरोस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जमीन मंजूर केला आहे.
याकामी आरोपी तर्फे ॲड. गिरीश भिडे व ॲड. हेमलता हडकर यांनी यशस्वी युक्तीवाद केला. कोकणशाही देवगड