
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजप पक्षाच्या वतीने निवडणूक लढून विजय मिळविलेल्या थेट नगराध्यक्षा तसेच ११ नगरसेवकांनी आज अधिकृत पणे स्वतंत्र गट स्थापन केला. या गट स्थापनेबाबतचे पत्र बुधवारी जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्या कडे सादर करण्यात आले.
सावंतवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मुसंडी मारत आपले वर्चस्व सिद्ध केले. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत नगराध्यक्षपदासह ११ नगरसेवक निवडून आणत भाजपने सत्ता काबीज केली. या विजयामुळे शालेय शिक्षणमंत्री तथा शिवसेना आमदार दीपक केसरकर यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसला होता. कोकणशाही सावंतवाडी








