
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील मुंबई–गोवा महामार्गावर पिंगुळी येथील साई मंदिरासमोर शनिवारी सकाळी सुमारे ८ वाजताच्या अपघात घडला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका कारने समोर चाललेल्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोन दुचाकीस्वार जखमी झाले आहेत.
पहिल्या धडकेत एक मोपेड दुचाकी महामार्गावरून तब्बल १५ फूट खाली फेकली गेली. मोपेडवरील स्वाराला गंभीर दुखापत झाली असून त्याला तातडीने उपचारासाठी नजीकच्या दवाखान्यात हलविण्यात आले आहे.
अपघातानंतरही कारचा वेग नियंत्रणात न आल्याने ती डिव्हायडर ओलांडून विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये घुसली. तेथे समोरून येणाऱ्या दुसऱ्या मोटरसायकलला कारने धडक दिली. या दुसऱ्या धडकेत मोटरसायकलस्वारही जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.
काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोकणशाही कुडाळ








