भव्य ग्लोबल कोकण महोत्सव 2025 नेस्को ग्राउंड गोरेगाव येथे उभारणीला सुरुवात

साईनाथ गांवकर / गोरेगाव (मुंबई )

यावर्षीचा ग्लोबल कोकण महोत्सव ऐतिहासिक असेल.

2011 पहिल्या वर्षी ग्लोबल कोकणने इतिहास घडवला. प्रवेशासाठी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स जिथे पोचण्यासाठी शंभर रुपये खर्च येतो तिथे तीन किलोमीटरची रांग लागली. लोकांना कोकणातील पर्यटन निसर्ग विकास लोककला या सर्वांचे आकर्षण निर्माण झाले. महाराष्ट्रातील हा सर्वात आकर्षक आणि भव्य महोत्सव तिथून सुरू झाला.

 गेल्या दहा वर्षात दहा ग्लोबल कोकण महोत्सव झाले यावर्षी अकरावा ग्लोबल कोकण महोत्सव यावर्षीचा  महोत्सव हा पूर्वीपेक्षा देखणा आणि माहिती पूर्ण असणार आहे. केवळ उत्सव नाही तर त्या पलीकडे जाऊन भव्य ग्लोबल कोकण उद्योग संमेलन आपण आयोजित करीत आहोत. शेती पर्यटन मासे प्रक्रिया ग्रामीण उद्योग नर्सरी विविध क्षेत्रात कोकणात लोकांनी प्रकल्प उभे करावेत जमिनी विकू नयेत यासाठी मार्गदर्शनाची व्यवस्था उभारत आहोत. विविध क्षेत्रातील तज्ञ यशस्वी उद्योजक यावेळी चार दिवस येथे थांबून ज्यांना कोकणात उद्योग उभे करायचे आहेत त्यांना मार्गदर्शन करतील. 

 मराठी उद्योजकांना व्यासपीठ मिळवून देणारा कोकण बाजारचा उपक्रम कोकणातील शेतकऱ्यांचे कृषी उत्पादनांचे प्रदर्शन, उमेद महिला बचत गटांचे कोकण सरस प्रदर्शन, कोकणातील बंदर विकासाचे माहिती देणारे दालन, पायाभूत सुविधा आणि आधुनिक विकास दालन, कोकणातील पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन या विषयातील वनविभागाच्या मदतीने वनविकास संमेलन , गुंतवणुकीच्या संधी देणारे गुंतवणूक आणि रिअल इस्टेट  दालन असे अनेक उपक्रम यावेळी आयोजित केले आहेत. 

  भारतात पहिल्यांदाच ३ डायमेन्शन 

360 डिग्री अंतराळ सफारी स्पेस टूर ची प्रत्यक्ष थरारक अनुभव देणारे ग्लोब टूर, नेहमीच आकर्षण फूड फेस्टिवल आणि भव्य संस्कृतीक महोत्सव अशी अनेक आकर्षणे यावर्षीच्या ग्लोबल कोकण महोत्सवाच्या आहेत.

यावर्षी उद्योग मंत्री उदय सामंत ग्लोबल कंपनीचे अध्यक्ष, फलोद्यान मंत्री भरत शेठ गोगावले स्वागत अध्यक्ष आहेत. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई वनमंत्री गणेशजी नाईक सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार, मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे आणि अनेक मान्यवर या महोत्सवाला सहकार्य करत आहेत. कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव या महोत्सवाचे संस्थापक आहेत.

 आपण दरवर्षी ग्लोबल कोकण महोत्सवाला येता यावर्षी अजून मोठ्या संख्येने या यासाठी हे निमंत्रण.

संजय यादवराव
संस्थापक ग्लोबल कोकण

ग्लोबल कोकण महोत्सव. ६-९ मार्च नेस्को गोरेगाव, ऑनलाइन मुंबई नोंदणी सुरू. बुक माय शो वर