चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळ रोडच्या बाजूला आग…

सिंधुदुर्ग प्रतिनिधी :

चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळ रोडच्या बाजूला जय भवानी बस स्टॉप येथे गाडेधाव कालवंडवाडी च्या दरम्यान काल सायंकाळी उशिरा गवताला आग लागली. सदर आग येथील रस्त्यावर उभे असलेल्या तीन युवकांमुळे लागली असावी असे समजून ग्रामस्थानी निवती पोलिसांना त्यांची माहिती दिली. तसेच ग्रामस्थांनी वेळीच आग विझवल्याने मोठा अनर्थ टाळला.
काल सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान तीन युवक पर्यटक आग लागली त्या ठिकाणी थांबले होते. त्यावेळी येथील स्थानिक ग्रामस्थ आपल्या दुचाकीने घरी जात होते तेव्हा आग लागल्याचे त्यांनी पाहिले सदर तिघे युवक त्या ठिकाणी उभे होते हे तिघे युवक नशेमध्ये असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. त्यांनी आपल्या बाजूच्या वाडीतील इतरांना बोलावून घेतले नंतर पोलीस पाटील चिपी यांना बोलावले तिथे जाऊन पोलीस पाटील यांनी एकंदरीत तेथील स्थिती लक्षात घेऊन पोलीस स्टेशन निवती येथे फोन केला सर्व हकीगत सांगितली. त्यानंतर तातडीने पोलिस श्री नितीन पाटील व श्री लोणे पोलिस अंमलदार आपल्या गाडीने हजर झाले. संबंधितांची चौकशी केली असता ते तिघे पुणे नगर व सातारा येथील असल्याचे समजले. त्यांच्याकडे लाइटर छोटी बॅग व दुचाकी गाडीमध्ये दारूची बाटली सापडली. पोलिसांनी त्यांना पुढील चौकशी साठी पोलीस स्टेशन निवती येथे आपल्याबरोबर घेऊन गेले. सिगारेट पेटवून टाकल्याने आगी लागण्याचे प्रकार होत असतात. त्या अनुषंगाने पोलिसांनी या युवकांना समज दिली आहे. दरम्यान सायंकाळी लागलेली आग ग्रामस्थांमुळे काय वेळानंतर आटोक्यात आली.