पद्मश्री बाबासाहेब वेंगुलेकर महाविद्यालया मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

28 फेब्रुवारी रोजी पणदूर येथील पद्मश्री बाबासाहेब वेंगुलेकर महाविद्यालयामध्ये डॉ.सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे सचिव डॉ.अरुण गोडकर उपस्थित होते. या दिनानिमित्त सायन्स विभागातर्फे पोस्टर प्रेसेंटेशन आणि मॉडेल प्रेझेंटेशन स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये कॉमर्स आणि आयटीच्या विद्यार्थ्यांनी विविध पोस्टर आणि मॉडेल प्रदर्शित केले. पोस्टर प्रेसेंटेशनमध्ये टीवाय बीबीआय मधील विद्यार्थिनी कु.डॉली गांगजी हिने प्रथम क्रमांक, एफवाय बीएससी संगणक शास्त्र शाखेतील नितीन रावले याने द्वितीय तर एफवाय बीएससी आयटी मधील विद्यार्थिनी कु. मयुरी चिंदरकर हिने तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्यांना चषक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. सायन्स विभाग प्रमुख प्रा.तन्वी सिंघन, प्रा.प्रथमेश गोसावी,प्रा. उमा सावंत,प्रा. श्वेता सुतार, प्रा.नागेश पालव तसेच सर्व प्राध्यापक या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सायन्स विभाग प्रमुख प्रा.तन्वी सिंघन यांनी केले, सूत्रसंचालन .प्रा स्मिता परब यांनी केले तर आभार कु. मयुरी चिंदरकर हीने व्यक्त केले.