राज्य सरकारच्या तब्बल ५०० सेवा आता व्हॉटस्अॅपवरही मिळणार आहेत. ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावरील या सेवा व्हॉटस्अॅपवर उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण करार शुक्रवारी करण्यात आला. या नव्या सुविधेमुळे महाराष्ट्रात ‘व्हॉटस्अॅप गव्हर्नन्स’ चा नवा अध्याय सुरू होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘मुंबई टेक वीक २०२५’ हा आशियातील सर्वात मोठ्या एआय इव्हेंट शुक्रवारी सुरू झाला. आठवडाभर चालणाऱ्या या कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर फडणवीस यांनी महत्त्वाच्या करारांची माहिती दिली.
या कराराच्या माध्यमातून सरकारी सेवांचे एका अर्थाने लोकशाहीकरण होणार असून,
- राज्यात ‘व्हॉटस्अॅप गव्हर्नन्स’ चा नवा अध्याय सुरू होण्याचा मार्ग मोकळा
- गावखेड्यातील शेवटच्या व्यक्तीलाही सरकारी योजनांचा लाभ थेट मोबाईलवर
- आशियातील सर्वात मोठ्या एआय इव्हेंटला मुंबईत शानदार सुरुवात आशिया खंडातील सर्वात मोठा टेक्निकल इव्हेंट मुंबईत पार पडत आहे. त्यामुळे मुंबई ही टेकची राजधानी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री गावखेड्यातील शेवटच्या व्यक्तीलाही आपल्या मोबाईलवरून या सेवांचा लाभ घेता येणार आहे.
‘एपीसीआय’चे जागतिक मुख्यालय मुंबईत
यासोबतच, जगभरात डिजिटल किंवा ऑनलाईन पेमेंटसाठी मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या नॅशनल पेमेंटस् कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात ‘एनपीसीआय’ने आपले जागतिक मुख्यालय मुंबईत उभारण्याचा निर्णय घेतल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. या मुख्यालयासाठी आवश्यक कागदपत्रे
‘एनपीसीआय’कडे सोपविण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर, ‘एमएमआरडीए’ आणि ‘एनपीसीआय’ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. मुंबईतील बीकेसी येथे ‘एनपीसीआय’च्या जागतिक मुख्यालयाच्या उभारणीसाठी ‘एनपीसीआय’ला भूखंड उपलब्ध करून देण्यात आला आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभाग आणि टीमसोब नॉलेज एआय हबसंदर्भात सामंजस्य करार झाला.
त्यासाठी अन्य कोणत्या पोर्टलवर जाण्याची आवश्यकता भासणार नाही, असे फडणवीस यांनी नमूद केले. राज्य सरकारच्या विविध सेवा अधिक सुलभ आणि लोकाभिमुख करण्यासाठी ‘मेटा’ प्लॅटफॉर्मच्या मदतीने ‘आपले सरकार पोर्टलवरील ५०० हून अधिक सेवा थेट व्हॉटस्अॅपवर उपलब्ध होणार आहेत, असे फडणवीस म्हणाले. राज्यात मोबाईल फोनचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झालेला आहे. आतापर्यंत ऑनलाईन सेवा उपलब्ध असूनही काही नागरिक ऑनलाईन प्रक्रियांपासून दू राहायचे. तथापि, आता व्हॉटस्अॅपचा सहज आणि सर्वदूर वापर लक्षात घेता, महत्त्वाच्य सरकारी सेवांचा लाभ थेट व्हॉटस्अॅपद्वारे देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठ राज्याचा माहिती-तंत्रज्ञान विभाग आणि ‘मेटा’ यांच्यात बीकेसी येथे सामंजस्य करा करण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह कौशल्य विकासमंत्र मंगलप्रभात लोढा, माहिती व तंत्रज्ञानमंत्री आशिष शेलार उपस्थित होते.









