मुंबई :
१५ वर्षात देशभरात १,००० हून अधिक कॅफे उघडून भारतातील इतर शहरांमध्येही वेगाने विस्तारले कॅफे कॉफी डे आता आर्थिक संकटात सापडल आहे. व्ही.जी. सिद्धार्थ यांनी १९९६ मध्ये ‘कॅफे कॉफी डे’ या नावाची कंपनी सुरु केली. सुरुवातीला कर्नाटकातील बंगळुरू येथे सुरु केलेले हे सीसीडी आउटलेट कालांतराने देशभरात पसरले.मात्र काही कालावधीनंतर देशातील मोठी कॉफी चेन कंपनी आर्थिक संकटात सापडत असल्याच्या चर्चा सुरु होत्या. दरम्यान आता त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून ही कंपनी बंद होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे कॉफी प्रेमींना याचा धक्का बसला आहे.
कॅफे कॉफी डे’ची मूळ कंपनी सीडीईएल बऱ्याच काळापासून अडचणीत आहे. २१ फेब्रुवारीच्या अंतिम मुदतीत सर्वोच्च न्यायालयाने आपला आदेश जारी करण्यात अयशस्वी झाल्यानंतर राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने हा निर्णय घेतला आहे. कंपनीवर २,२२८ कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याचा आरोप आहे. हे प्रकरण राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाकडे गेल्यापासून कंपनीवर दबाव आहे. तथापि, एनसीएलटीने (NCLT) ने अंतिम निर्णय न घेतल्याने, कंपनीविरुद्ध दिवाळखोरीची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे
.दरम्यान, कॉफी डे ग्रुपची मूळ कंपनी CDEL ही कॅफे कॉफी डे आउटलेट चेन व्यतिरिक्त रिसॉर्ट कन्सल्टन्सी सेवा आणि कॉफी बीन ट्रेडिंग चालवते. जुलै २०१९ मध्ये संस्थापक बीजी सिद्धार्थ यांच्या निधनापासून हि कंपनी आर्थिक संकटाचा सामना करत आहे. दरम्यान हातात हि , कंपनी तिच्या मालमत्तेची विक्री आणि पुनर्रचना करून कर्ज कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.









