महाकाली यात्रेसाठी येणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला ;अपघातात मायलेकाचा मृत्यू…

रविवारी अपघात घडला असून मात्र, मंगळवारी घटना उघडकीस आली , त्यानंतर
मोबाईल लोकेशन आधारे शोधमोहीम सुरु करण्यात आली होती. पुण्याहून चिपळूणकडे येत असलेली कार कुंभार्ली घाटात सुमारे ४०० फूट दरीत कोसळली. या घटनेत कुंभार्ली येथील आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. ते दोघेही घरी न आल्याने शोध घेण्यास सुरुवात केल्यानंतर मंगळवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. सायंकाळी उशिरापर्यंत दोघांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते.
या घटनेत कुंभार्ली येथील विश्वजीत जगदीश खेडेकर (४२) व सुरेखा जगदीश खेडेकर (६५)खेडेकर यांची पत्नी पतीच्या मोबाईलवर फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र, कॉल रिसीव्ह केला जात नव्हता. अखेर या दोघांचाही दुर्दैवीरित्या मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, विश्वजीत खेडेकर हे आपल्या आईसह रविवारी दुपारी पुण्याहून कुंभार्ली येथे घरी येण्यासाठी निघाले होते. सातारा येथे आल्यानंतर पाच, सहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा घरच्यांशी संपर्क झाला होता. मात्र, त्यानंतर ते रात्री घरी पोहोचलेच नाहीत. कुंभार्ली घाटात आल्यानंतर ही कार सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळली. गेल्या दोन दिवसापासून अपघाताची कोणालाच माहिती नव्हती. दुपारी खेडेकर यांचे नातेवाईक शिरगाव पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी मोबाईल लोकेशन शोधले असता, कुंभार्ली घाटात आढळून आले. त्यानंतर पोलिस व नातेवाईक तसेच ग्रामस्थानी शोध मोहीम सुरू केली असता, या दोघांचा मृतदेह आढळून आला.
खेडेकर कुटुंब हे इंदिरा काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष भरत लब्ध्ये यांचे नातेवाईक होते. या अपघाताची नोंद अलोरे शिरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. खेडेकर यांच्या पश्चात मुले पत्नी तीन भाऊ असा परिवार आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला, याची तपशीलवार माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.