नगरपरिषदेच्या नादुरुस्त घनकचरा मशीन व बायो टॉयलेटची आ. निलेश राणे यांनी केली स्वखर्चाने दुरुस्ती….

कुडाळ प्रतिनिधी

कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या दातृत्वाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. काही दिवसांपूर्वी आ. राणे यांनी शहराचा स्पॉट पंचनामा केला असता शहरात पालिकेच्या वतीने बसवण्यात आलेल्या बायो टॉयलेट आणि घनकचरा मशीनची दुरावस्था झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. यामुळे स्वखर्चाने त्याची दुरुस्ती करून देणार असल्याचे निलेश राणे यांनी जाहीर केले होते. त्यानुसार बायो टॉयलेट आणि घनकचरा मशीनचे नूतनीकरण पूर्ण झाले असून आ. राणे यांच्या हस्ते शनिवारी रात्री त्याचे लोकार्पण करण्यात आले. मालवण शहर आणि किनारपट्टी कचरा मुक्त करण्याचा ध्यास आपण घेतला असून आज त्याची सुरुवात करण्यात आली आहे. शहरात आणखी काही ठिकाणी अद्यावत टॉयलेट आणि कचरा प्रक्रिया मशीन देण्यात येतील, फक्त त्याची देखभाल ठेवण्याची काळजी अधिकारी वर्गाने घ्यावी, असे निलेश राणे म्हणाले.
आमदार निलेश राणे यांनी मागील महिन्यात मालवण नगरपालिकेला भेट देऊन येथील कामकाजाचा आढावा घेतला होता. त्यावेळी घनकचरा मशीन नादुरुस्त असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर काही दिवसापूर्वी मालवण बंदर जेटीवर जात मालवण बंदर जेटी, कचरा व्यवस्थापन मशीन व पर्यटकांसाठी बंदर जेटीवर उभारण्यात आलेल्या प्रसाधनगृहाची त्यांनी पहाणी केली होती. त्यावेळी बंदर जेटी स्वच्छ, सुरक्षित आणि आकर्षक बनवण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. या आश्वासनाची पूर्तता करत मालवण नगरपरिषदेच्या नादुरुस्त घनकचरा मशीन व बायो टॉयलेटची आ. निलेश राणे यांनी स्वखर्चाने दुरुस्ती करून शनिवारी रात्री लोकार्पण करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, भाजपा शहराध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, युवासेना जिल्हाप्रमुख ऋत्विक सामंत, शहर अध्यक्ष बाळू नाटेकर, मंदार लुडबे, भाई मांजरेकर, महिला उपजिल्हाप्रमुख नीलम शिंदे, युवतीसेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, अंजना सामंत, मधुरा तुळसकर, प्रियांका मेस्त्री यांच्यासह पालिकेचे अवेक्षक सुधाकर पाटकर व अन्य अधिकारी, कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित होते.मालवण नगरपालिकेने सुमारे ३५ लाख रुपये खर्चून खरेदी केलेली घनकचरा मशीन गेली चार वर्षे बंद होती. मागील महिन्यात आपण शहराची पाहणी केली असता ही मशीन मच्छिमार्केट नजिक अडगळीत ठेवल्याचे दिसून आले. तसेच बायो टॉयलेट देखील खराब झाली होती. त्यामुळे स्वखर्चाने त्याची दुरुस्ती केली असून या दोन मशीन मधून प्रतिदिन ५०० किलो ओला कचरा प्रोसेस होणार आहे. मालवण शहर कचरा मुक्त करण्याचा आपला प्रयत्न असून शहर आणी किनारपट्टी परिसरात आणखी काही मशीन देणार आहोत, असे आमदार निलेश राणे म्हणाले.