कोकणशाही

कोकणशाही

🏆 ‘तुमच्या यशाचा महाराष्ट्राला अभिमान!’ – पी. व्ही. सिंधूला मंत्री नितेश राणेंच्या शुभेच्छा

मुंबई : भारतीय बॅडमिंटनच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल अशी कामगिरी करत पी. व्ही. सिंधू यांनी जपान ओपन २०२६ स्पर्धेचे विजेतेपद पटकावत नवा इतिहास रचला आहे. जपान ओपनचे विजेतेपद पटकावणाऱ्या त्या पहिल्या भारतीय खेळाडू ठरल्या आहेत.अथक परिश्रम, जिद्द आणि अविरत मेहनतीच्या…

💥 सावरोली-खारपाडा मार्गावर थरार! LPG सिलेंडरचा ट्रक उलटला, मोठा अनर्थ टळला

खोपोली : सावरोली-खारपाडा मार्गावर कुंभिवली येथे शनिवारी सकाळी गॅस सिलेंडरने भरलेला ट्रक पलटी झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ट्रकमध्ये तब्बल ३५० भरलेले एलपीजी सिलेंडर असल्याने क्षणभर मोठ्या स्फोटाची भीती निर्माण झाली होती. मात्र सुदैवाने एकाही सिलेंडरला गळती न लागल्याने संभाव्य…

📈 86 कोटींची ऐतिहासिक विमा भरपाई! सिंधुदुर्गातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा

सिंधुदुर्ग : केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या फळपीक विमा योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे 35 हजार आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 86 कोटी रुपयांची विमा भरपाई जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पालकमंत्री नितेश राणे, खा. नारायण…

कुडाळ एसटी बसस्थानक आवारात डास प्रतिबंधक फवारणी

नगरसेवक मंदार शिरसाट यांचा पुढाकार कुडाळ : पावसाळी हंगामात आजारांचे प्रमाण वाढत असते. यामध्ये डेंग्यू, कॉलरा, हिवताप यासारखे आजार डोके वर काढतात. हे आजार प्रामुख्याने डासांमुळे होत असतात. या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुडाळ नगरपंचायतचे नगरसेवक मंदार शिरसाट यांनी सामाजिक बांधिलकी…

संपादक सागर चव्हाण यांच्यावरील गुन्हे मागे घ्या- अखिल भारतीय संपादक डिजिटल मिडीया संघटनेचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन

सिंधुदुर्ग : संपादक सागर चव्हाण यांच्यावर महावितरण विभागाकडून दाखल करण्यात आलेले गुन्हे हे पत्रकारितेचा आवाज दडपण्याचा आणि सत्य मांडणाऱ्या पत्रकारांना दबावाखाली आणण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप करत डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, सिंधुदुर्ग आता आक्रमक झाली आहे. या प्रकरणाची निष्पक्ष…

किल्ले राजकोटावर स्वच्छतेचा जागर; लायन्स क्लब व नगरपालिकेचा संयुक्त उपक्रम

मालवण : लायन्स क्लब मालवण आणि मालवण नगरपरिषद आरोग्य व स्वच्छता विभाग यांच्या वतीने सामाजिक उपक्रमांतर्गत किल्ले राजकोट येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.लायन्स क्लब मालवण अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, सेक्रेटरी पुनम चव्हाण, खजिनदार राधिका मोंडकर, जयश्री हडकर, रूपा कांदळगांवकर, बाबल कवठकर,…

🩸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त मालवणात महारक्तदान शिबीर

मालवण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष, मालवणतर्फे बुधवार, २२ जुलै रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर भारतीय जनता पक्षाच्या मालवण कार्यालयात आयोजित करण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करून सामाजिक…

अजित पवारांच्या जयंतीनिमित्त वेंगुर्त्यात सेवा, सन्मान आणि सामाजिक बांधिलकी

वेंगुर्ले : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त २२ ते २८ जुलै या कालावधीत जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्याचा निर्णय राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला.वेंगुर्ले कॅम्प येथील महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी…

‘जय जगन्नाथ’च्या जयघोषात मुंबई दुमदुमली; मंत्री नितेश राणेंची रथयात्रेत उपस्थिती

मुंबई : मुंबईतील इस्कॉन जुहू (ISKCON Juhu) द्वारे आयोजित भगवान श्री जगन्नाथ यांच्या पवित्र रथयात्रेनिमित्त, त्यांच्या ४५ व्या वार्षिक रथयात्रा महोत्सवात मंत्री नितेश राणे कुटुंबासह सहभागी झाले. या प्रसंगी, भगवान श्री जगन्नाथ यांचे दिव्य रूप पाहणे, रथ ओढणे आणि त्यांच्या…

पालकमंत्री नितेश राणेंचा विकासाचा मास्टरप्लॅन; सिंधुदुर्गसाठी SGIRचा रोडमॅप तयार

मुंबई : सिंधुदुर्ग ग्लोबल इंडस्ट्रियल रिजन (SGIR) प्रकल्पाच्या दूरदृष्टी, धोरणात्मक आराखडा आणि अंमलबजावणीच्या कृती आराखड्याबाबत मंत्रालयात मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी बैठक आयोजित केली बैठकीत सिंधुदुर्गच्या सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाला चालना देणारा औद्योगिक परिसर उभारण्यावर भर…