कोकणशाही

कोकणशाही

मोकाट जनावरांच्या सुरक्षेसाठी मैदानात उतरले मंदार शिरसाट; रिफ्लेक्शन पट्टे बांधून दिला सुरक्षिततेचा संदेश!

कुडाळ : रात्रीच्या अंधारात रस्त्यांवर फिरणाऱ्या किंवा बसणाऱ्या मोकाट जनावरांमुळे होणारे भीषण अपघात टाळण्यासाठी कुडाळमध्ये एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. ‘सुरक्षित कुडाळ, अपघातमुक्त कुडाळ’ या संकल्पनेअंतर्गत आज, २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ९.०० वाजता सुमारे १४ मोकाट जनावरांना रेडियमचे ‘रिफ्लेक्शन…

मच्छीमारांच्या प्रश्नांसाठी राणे कुटुंबाचा दिल्ली दरबारात जोरदार पाठपुरावा!; केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांची सकारात्मक भूमिका!

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या ज्वलंत प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारकडे निर्णायक पाठपुरावा सुरू झाला आहे. केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांची नवी दिल्लीतील कर्तव्य भवन येथे पालकमंत्री नितेश राणे यांनी खासदार नारायण…

संशोधनातून सिद्ध केली बुद्धिमत्तेची ताकद; सुप्रिया नलावडे यांची पीएच.डी. पदवीने गौरवशाली भरारी!

डीप लर्निंगच्या माध्यमातून ‘Sentiment Analysis’ विषयावर संशोधन; सुप्रिया नलावडे यांना पीएच.डी. पदवी संजय पेटकर / कोकणशाही कणकवली – कोल्हापूर : संजय घोडावत विद्यापीठ, अतिग्रे येथून इलेक्ट्रॉनिक्स विषयात ‘Sentiment Analysis using Deep Learning’ या अत्याधुनिक विषयावर संशोधन पूर्ण करून सौ. सुप्रिया…

वैश्यवाणी समाजाच्या OBC प्रश्नावर : आमदार प्रमोद जठार, आमदार किरण सामंत यांच्या पाठपुराव्याला यश

सन २००८ च्या शासन परिपत्रकाप्रमाणे निर्णय घेण्याचे मंत्री अतुल सावे यांचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश मंत्री अतुल सावे, मंत्री उदय सामंत आमदार किरण सामंत, आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थिती बैठक संपन्न संजय पेटकर / कोकणशाही कणकवली / मुंबई : वैश्यवाणी समाजाच्या…

यंगस्टार मित्रमंडळाच्या श्रावणमेळ्यात विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

संजय पेटकर / कोकणशाही कणकवली : यंगस्टार मित्रमंडळाच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्रावणमेळ्याचा उत्साहात समारोप झाला. या मेळ्यानिमित्त रानभाजी पाककला स्पर्धा, लहान मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा तसेच आदर्श संगीत विद्यालय, कणकवली यांचा भावगीत व भक्तिगीतांचा ‘सुरसंगम’ हा सुरेल…

झाडी हटली, धोका टळला; आडारी मार्गाला मिळाला मोकळा श्वास!

मालवण : शहरातील देऊळवाडा-आडारी मार्गालगत वाढलेल्या दाट झाडीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. त्याचबरोबर झाडांच्या फांद्या व वेली वीज वाहिन्यांना घासत असल्याने आडारी परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याची समस्या निर्माण झाली होती. यामुळे स्थानिक नागरिकांनी वीज वितरण कंपनीकडे वीज वाहिन्यांवरील…

आठवडाभर मृत्यूशी झुंज… अखेर २३ वर्षीय इंद्रजीतची प्राणज्योत मालवली!

सिंधुदुर्गनगरी : कारखाली अडकला. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल झाला. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून प्राण वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. कुटुंबीयांच्या डोळ्यांत त्याच्या जगण्याची आस होती. मात्र मृत्यूशी सुरू असलेली ही झुंज अखेर सोमवारी (२४ ऑगस्ट) पहाटे संपली. अपघातात जखमी इंद्रजीत बोडेकर…

वेंगुर्ले ते अक्कलकोट प्रवास आता अधिक सोयीचा; ३० ऑगस्टपर्यंत जादा बसची सुविधा!

वेंगुर्ले : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वेंगुर्ले आगारातर्फे २५ ते ३० ऑगस्ट या कालावधीत दररोज सकाळी ७.४५ वाजता वेंगुर्ले-अक्कलकोट ही जादा बस सोडण्यात येणार आहे. ही बस वेंगुर्ले बस स्टॅण्डवरून निघणार असून मठमार्गे कुडाळ, कणकवली, बावडामार्गे अक्कलकोट असा प्रवास…

शैक्षणिक उपक्रमातून सामाजिक संस्थांनी केलेली गुंतवणूक आदर्शवत – हर्षदा वाळके

नांदगाव पंचक्रोशीतील प्राथमिक शाळांमध्ये वह्या वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ; प्राण जीवन संयोग संस्था व जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून उपक्रम संजय पेटकर / कोकणशाही कणकवली :प्राण जीवन संयोग संस्था व जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून वह्या वाटपाच्या उपक्रमात मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे, तो आम्हाला दिसत…

समुद्र खवळला, देवगड धावून आला; ६०+ मासेमारी नौकांना सुरक्षित आसरा!

देवगड : समुद्रात मोठ्या प्रमाणात वारे आणि उंच लाटांमुळे मासेमारी करणे अशक्य झाल्याने गुजरात राज्यातील तब्बल ६० पेक्षा अधिक मासेमारी नौकांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुरक्षित मानल्या जाणाऱ्या आनंदवाडी (देवगड) बंदरात आश्रय घेतला आहे. या नौकांवरील खलाशांच्या आणि नौकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय…