कोकणशाही

कोकणशाही

कुडाळमध्ये हृदयद्रावक घटना; २२ वर्षीय युवकाचा नदीत बुडून मृत्यू

कुडाळ : कविलकाटे परिसरातून वाहणाऱ्या भंगसाळ नदीत पोहण्यासाठी गेलेल्या एका २२ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. वैभव नितीन बांदेकर (रा. बाजारपेठ, कुडाळ) असे या मृत युवकाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण कुडाळ शहरावर शोककळा पसरली आहे.वैभव बांदेकर…

भाजपाच्या २३ प्रदेश प्रवक्त्यांच्या यादीत माजी आमदार प्रमोद जठार दुसऱ्या क्रमांकावर

कणकवली : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या प्रदेश प्रवक्ते पदी माजी आमदार प्रमोद जठार यांची निवड करण्यात आली आहे. भाजपाच्या संघटनात्मक नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून माजी आमदार प्रमोद जठार यांच्यावर प्रदेश प्रवक्ते पदाची नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. प्रमोद जठार…

खानोलीत रंगला दशावतार कलेचा महाकुंभ; भाजप युवा नेते विशाल परब यांच्याकडून कलाकारांचा गौरव

सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपणाऱ्या खानोली गावामध्ये ‘खानोली दशावतार महोत्सवाचे’ अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते. कोकणची लोककला असलेल्या दशावताराला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित या महोत्सवाला भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल परब यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी बोलताना विशाल परब यांनी…

शिक्षणसेवेचा प्रेरणादायी आदर्श : ₹1.51 लाखांची गुरुदक्षिणा

देवगड तालुक्यातील शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व सेवानिवृत प्राचार्य विजयकुमार सखाराम कदम आणि सुप्रिया विजयकुमार कदम यांनी संस्थेचे पहिले मानद अधिक्षक अण्णासाहेब कदम यांच्या स्मरणार्थ कृतज्ञता व्यक्त करीत शाळेच्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी एक लाख एक्कावन्न हजारांच्या देणगीचा धनादेश…

विदर्भ तापतोय, कोकण घामाघूम – महाराष्ट्रात हवामानाचा तिहेरी खेळ

पुणेः देशात पुढील चार ते पाच दिवस उष्णतेच्या लाटेचा प्रभाव वाढणार असून, आधीच हॉट स्पॉट ठरलेल्या विदर्भातदेखील पुन्हा उष्णतेची लाट येणार आहे. यामुळे पुन्हा एकदा उच्चांकी तापमानाची नोंद होण्याची शक्यता आहे आतापर्यंत या मागात ४५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचले आहे.…

देव वेतोबा कोकणवासियांना सुख समृद्धी लाभू दे.! – विशाल परब

भाजप युवा नेते विशालजी परब व सपत्नीक यांच्यासह घेतले श्री देव वेतोबाचे दर्शन; कोकणच्या समृद्धीसाठी साकडे! कोकणचे श्रद्धास्थान असलेल्या आरवली येथील श्री देव वेतोबा चरणी युवा नेते विशालजी परब यांनी सपत्नीक सौ. वेदिका परब यांच्यासह नतमस्तक होऊन दर्शन घेतले. यात्रेच्या…

रायगड दक्षिण जिल्हा प्रभारीपदी ना. नितेश राणे यांची नियुक्ती

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केली प्रभारींची यादी कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री आणि भाजपाचे प्रखर हिंदुत्ववादी नेते ना. नितेश राणे यांची रायगड दक्षिण जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप…

युवाशक्तीचा जल्लोष! ‘युवाशक्ती जागर यात्रा’चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भव्य शुभारंभ

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित ‘युवाशक्ती जागर यात्रा’ महाराष्ट्र दौऱ्याचा शुभारंभ सोहळा राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. रवींद्रजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आज करण्यात आला. भाजपाचा झेंडा दाखवून युवा मोर्चा महाराष्ट्र…

चिंताजनक बातमी! Sharad Pawar यांची तब्येत बिघडली, डॉक्टरांकडून मोठी माहिती

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुन्हा एकदा प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. रुग्णालयात दाखल असल्याने शरद पवार आज बारामतीमध्ये…

प्रगती अभियान २०२५-२६ मध्ये मत्स्य विभागाची झेप – मंत्री नितेश राणेंच्या नेतृत्वात नवा विक्रम

मुंबई : प्रशासनात नवकल्पना, कार्यक्षमतेत वाढ आणि लोकाभिमुख सेवा देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान अंतर्गत २०२५-२०२६ या वर्षासाठी राज्यस्तरीय पारितोषिक विजेते जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्यावतीने १९ एप्रिल २०२६ रोजी…