वैभववाडी येथील नगरसेविका सानिका रावराणे, वाभवे यांच्यासह सोसायटीचे चेअरमन संतोष मांजरेकर आणि सुनील रामचंद्र रावराणे यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे.त्यांचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री आमदार नितेश राणे यांनी पक्षात स्वागत केले. या वेळी नगराध्यक्ष नेहा माईणकर, दिलीप रावराणे, दीपक माईणकर आणि अनेककार्यकर्ते उपस्थित होते.










