भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या मंदिर ही प्रशाला एका अनोख्या पद्धतीने साजरा करणार असल्याची माहिती प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.सुनील जाधव यांनी दिली.
या अनोखा ध्वजारोहण सोहळा रविवार दि .२६ जानेवारीला संस्थाध्यक्ष माजी आमदार अॅड.अजितराव गोगटे यांच्या शुभहस्ते सकाळी ८.०० वा.संपन्न होणार आहे.सोहळ्या दरम्यान ध्वजस्थळावर घोड्यावरून झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे सलामी ट्रॅक वर आगमन होईल.त्यामागून संस्थाध्यक्ष मान.अजितराव गोगटे यांचे जीपमधून सलामी ट्रॅकवर आगमन होईल.ध्वजारोहण झाल्यावर विद्यार्थ्यांकडून मान्यवरांना सलामी ,विद्यार्थी मनोरे ,लेझीम संचलन , लेझीम डांस , ढोल पथक यांचे दिमाखदार सादरीकरण होणार आहे . ध्वजारोहण झाल्यानंतर सकाळी ९ ते १० या वेळेत मुलांच्या प्रभात फेरी चे आयोजन करण्यात आले असून या प्रभातफेरी मध्ये चित्ररथाचेही आकर्षण असणार आहे. या नेत्रदीपक सोहळ्याचा आनंद देशप्रेमी नागरिकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून लुटावा असे आवाहन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.सुनील जाधव यांनी केले आहे.









