अधिकृत संकेतस्थळ (वेबसाईट) आणि पहिल्या पुस्तकाचे दिमाखदार अनावरण; गुणवंत जलतरणपटू व पालकांचा विशेष सत्कार…..
रत्नागिरी : महेश मिलके स्विमिंग ग्रुपचा ८ वा वर्धापन दिन दिनांक २६ जुलै २०२६ रोजी अत्यंत उत्साही आणि मंगलमय वातावरणात पार पडला. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे ग्रुपच्या अधिकृत संकेतस्थळाचे (वेबसाईट) अनावरण आणि ग्रुपच्या प्रवासाचा वेध घेणाऱ्या पहिल्यावहिल्या पुस्तकाचे दिमाखदार प्रकाशन करण्यात आले.
या भव्य कार्यक्रमात महेश मिलके स्विमिंग ग्रुपच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य, विभाग व जिल्हास्तरावर चमकदार कामगिरी करणाऱ्या गुणवंत खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला. यासोबतच, गेली ८ वर्षे प्रशिक्षक महेश मिलके सरांवर निरंतर विश्वास ठेवून प्रत्येक प्रसंगी पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या पालकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला तब्बल 300 हून अधिक क्रीडाप्रेमी व पालकांनी उपस्थिती दर्शवली.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती :-
या सोहळ्याला रत्नागिरी जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील दिग्गजांची उपस्थिती लाभली होती. यामध्ये प्रामुख्याने:
प्रशासकीय व राजकीय: रत्नागिरीचे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. शिंदे, नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे, भाजप महिला मोर्चा मंत्री सौ. शिल्पा मराठे, तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य ॲड. मांडवकर.
विधी व व्यावसायिक क्षेत्र: ज्येष्ठ विधितज्ञ ॲड. भाई गवाणकर, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्री. संतोषजी तावडे (कौमुदी कन्स्ट्रक्शन).
सामाजिक व क्रीडा क्षेत्र: क्षत्रिय मराठा मंडळाच्या उपाध्यक्षा सौ. प्राचीताई सुर्वे, निवृत्त पोलीस कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री. ओंकार चाळके (रिटायर्ड PSI), आणि राष्ट्रीय जलतरणपटू श्री. मारुती चरापले.
वैद्यकीय क्षेत्र: नामांकित स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शुभांगी बेडेकर, हृदयविकारतज्ज्ञ डॉ. प्रणाम केंद्रे आणि नेत्रविकारतज्ज्ञ डॉ. सूर्यवंशी.
उपस्थित मान्यवरांनी महेश मिलके सरांच्या मार्गदर्शनाचे, शिस्तीचे आणि रत्नागिरीत जलतरण क्षेत्रात नवीन खेळाडू घडवण्याच्या समर्पित वृत्तीचे भरभरून कौतुक केले.
पालकांचे मोलाचे योगदान
हा सोहळा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी ग्रुपमधील पालकांनी विशेष मेहनत घेतली. यामध्ये शिवसेना शहरप्रमुख श्री. बिपीन बंदरकर, श्री. विक्रांत देसाई व श्री. विनय देसाई (विवेक हॉटेल), श्री. गिरीधर तावडे, श्री. अजय काळे, श्री. शरद भिडे, श्री. चंदन जाधव, श्री. अल्फाराज कापडे, श्री. स्वप्नील खटावकर, श्री. सत्यवान बिरवाडकर, श्री. अजित पिलणकर, श्री. कौस्तुभ सावंत, आणि श्री. चंदन खानविलकर इत्यादी पालकांनी मोलाची साथ दिली.
क्रीडा क्षेत्रातील प्रगतीसोबतच डिजिटल विश्वात टाकलेले पाऊल (वेबसाईट) आणि पुस्तकरूपी दस्ताऐवजीकरण यामुळे महेश मिलके स्विमिंग ग्रुपच्या यशात नवी पालवी फुटेल, असा विश्वास सर्व उपस्थितांनी व्यक्त केला.












