कुडाळात FSSAI ची धाड । माजी आमदाराचा बाझार उठला

अखेर अन्न व भेसळ प्रशासनाची पडली धाड

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात रिल्स स्टार च्या माध्यमातून जाहिरात बाजी करून हल्लीच दणक्यात सुरु करण्यात आलेल्या एका बाझार मध्ये अन्न व भेसळ प्रशासनाने धाड टाकली आहे. संबंधित दुकानदाराकडे फूड अँड ड्रग्स चे लायसन्स नसतानाही दुकान सुरु करून त्याने व्यवसाय सुरु केला. या दुकानातून कित्येक ग्राहकांनी गृहपयोगी साहित्य नेले आहे. अन्न व भेसळ प्रशासनाचे कुठल्याही पद्धतीचे लायसन नसताना दुकानातून माल विक्री केल्याने ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न दूधस उंबरठ्यावर उभा आहे.

‘प्राजक्ता’ची फुले उधळत कुडाळात नुकतेच सुरु झालेले व एका माजी राजकीय नेत्याचे असलेले हे दुकान मुळ नियमात चुकल्याने अन्न व भेसळ प्रशासन याबाबत नेमकी कोणती कारवाई करतेय याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. या जागेवर बांधकाम करण्याकर्ता सुद्धा कोणत्याही प्रकारची परवानगी न घेतल्याने अनधिकृत बांधकाम काढण्याचे आदेश नगरपंचायत प्रशाससनाकडून देण्यात आले आहेत. सगळे नियम धाब्यावर बसवून व्यवसाय करणाऱ्यांना कायद्याचा बडगा दिसला पाहिजे अशी अपेक्षा सर्वसामान्य मधून व्यक्त होतं आहे. तुकाराम मुंढे यांच्यासारखे कणखर आयुक्त असलेले सिंधुदुर्गचे अन्न व प्रशासन विभागाच्या भूमिकेकडे समस्त कुडाळ वासियांचे लक्ष लागून राहिले आहे.