ओरोस, : इंधन तुटवड्यामुळे चोरांच्य नजरा आता गैस सिलिंडरकडे वळू लागल्या आहेत. मे महिन्याच्या कालावधीत ओरोस परिसरात दोन सिलिंडर चोरीला गेल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान सोने नाणे आणि पैसा अडका याचप्रमाणे आता सिलिंडर सांभाळण्याची वेळ आली आहे. मुंबई-गोवा महामार्गालगतच लागून असलेल्या ओरोस येथील एका वडापाव टपरीवाल्याचा गॅस सिलिंडर काही दिवसांपूर्वी चोरीला गेला आहे. याबाबत शोध मोहीम राबवूनही तो अद्याप मिळून आलेला नाही. दरम्यान याबाबत पोलीस स्थानकात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ओरोस येथील बौद्धवाडीतील एका घराचा दरवाजा तोडून गॅस सिलिंडरसह भांडीकुंडी चोरीला गेल्याची दुसरी घटना घडली होती.












