कुडाळात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी भव्य कार्यशाळा; आ. निलेश राणेंचे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन

कुडाळ : शिवसेनेची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘महालक्ष्मी हॉल, कुडाळ’ येथे आमदार निलेश राणेंच्या उपस्थित कुडाळ व कणकवली मतदारसंघातील शिवसेना बी.एल.ए. (BLA) व एस.आय.आर. (SIR) पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिकांची महत्त्वपूर्ण कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.
यावेळी एस.आय.आर. शिवसेना राज्यप्रमुख मा. श्री. अविनाशजी सनस यांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन करत संघटन बळकटीकरण, आगामी जबाबदाऱ्या आणि पक्षाच्या धोरणांविषयी आमदार निलेश राणेंनी मोलाचे विचार मांडले.
या प्रसंगी शिवसेना उपनेते श्री. संजयजी आंग्रे,जिल्हाप्रमुख श्री. दत्ताजी सामंत, लोकसभा संपर्कप्रमुख श्री. बाळा चिंदरकर, श्री. संजय पडते, श्री. काका कुडाळकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. दादा साईल यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.