“आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत बांदिवडेत शिवसेनेचा भगवा फडकला”

मालवण बांदिवडे गावातील उबाठा कार्यकर्त्यांनी शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर व विकासकामांवर विश्वास ठेवत आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.
यावेळी जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, जि. प. सदस्या सौ. वर्षा सांबारी, मालवण उपनगराध्यक्ष श्री. दीपक पाटकर, श्री. विनायक बाईत तसेच इतर पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.