नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्था, कुडाळ – सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित “मालवणी महोत्सव – कोकणी मातीतील उद्योग आणि संधी” या भव्य कार्यक्रमाचे उद्घाटन कोकणचे भाग्यविधाते तथा खासदार सन्माननीय श्री. नारायणरावजी राणे साहेब आणि आमदार निलेश राणे यांच्या शुभहस्ते कुडाळ येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
या कार्यक्रमामध्ये सहभागी होत उपस्थितांशी संवाद साधत स्थानिक उद्योगांना पाठबळ देण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले. 🚩
याप्रसंगी सौ. नीलम नारायण राणे, या संस्थेच्या अध्यक्षा सौ. संध्या तेरसे, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत, श्री रणजीत देसाई, भाजपा महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, श्री. काका कुडाळकर, श्री. संजय पडते, कुडाळ पंचायत समिती सभापती श्री. मिलिंद नाईक, श्री. रुपेश कानडे व अन्य मान्यवर, नागरिक व व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.












