वेंगुर्ले : आरवली येथील प्रसिद्ध श्री देव वेतोबाचा वर्धापनदिन सोहळा मंगळवार, २१ एप्रिल रोजी होणार आहे. यानिमित्त १९ ते २३ एप्रिल या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. १९ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून धार्मिक कार्यक्रम, रात्री ८ वाजता पालखी प्रदक्षिणा, रात्री ८.३० वाजता नाईक मोचेमाडकर दशावतारी मंडळाचे नाटक, २० रोजी सकाळी ८ वाजल्यापासून धार्मिक कार्यक्रम, सायंकाळी ५ वाजता लालजी देसाई संगीत विद्यालय आयोजित ‘अभंग गीत गायन स्पर्धा रात्री ८ वाजता पालखी प्रदक्षिणा, २१ रोज सकाळी ८ वाजल्यापासून लघुरूद्र, अभिषेक, पुर्णाहुती, बलिदान, दुपारी १ वाजता महाआरती व महाप्रसाद, रात्री १० वा. पालखी प्रदक्षिणा, १०.३० वा. राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत क्रमांक प्राप्त कलावलय वेंगुर्ले ‘अथांग” हे दोन अंकी नाटक, २२ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून धार्मिक कार्यक्रम, रात्री ८ वा. पालखी प्रदक्षिणा, रात्री ८.३० वा. ‘झी मराठी सारेगमप फेम लिटल चॅम्प कु. गार्गी सिद्धये (गोवा फोडा) हिची अभंग, भक्तीगीत, भावगीत व नाट्यगीतांची सुरेल मैफल, २३ रोजी रात्री ८ वाजता पालखी प्रदक्षिणा, रात्री ९ वाजता रामेडार दशावतार नाट्यमंडळ वेंगुर्ले यांचा ‘रुक्मिणी स्वयंवर हा नाट्यप्रयोग होणार आहे. लाभघ्यावा, असे आवाहन श्री देव वेतोबा देवस्थान कमिटीतर्फे केले आहे.











