आज दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी आपल्या पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालयामध्ये विश्ववंदनीय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी करण्यात आली. दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे सचिव डॉ. अरुण गोडकर साहेब यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूज्ज प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्राचार्य प्रा. राजेंद्र पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.












