
देवगड : या निवडणुकीत स्वच्छता व आरोग्य सभापतीपदी निवृत्ती उर्फ बुवा तारी, पाणी पुरवठा सभापतीपदी सौ. तन्वी चांदोस्कर, बांधकाम सभापतीपदी रोहन खेडेकर, तर महिला व बालकल्याण उपसभापतीपदी सौ. मनीषा जामसंडेकर यांची बिनविरोध निवड जाहीर झाली.
देवगड | देवगड–जामसंडे नगरपंचायतीच्या विषय समिती सभापती व उपसभापती पदांसाठी झालेल्या निवड प्रक्रियेत भारतीय जनता पार्टी (भाजप)ने सर्वच पदांवर यश मिळवत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. उमेदवारी अर्जांची छाननी, नामनिर्देशन निश्चिती व अंतिम घोषणेसह संपूर्ण प्रक्रिया नियमबद्धरीत्या पूर्ण होऊन निवड जाहीर करण्यात आली.
या निवडणुकीत स्वच्छता व आरोग्य सभापतीपदी निवृत्ती उर्फ बुवा तारी, पाणी पुरवठा सभापतीपदी सौ. तन्वी चांदोस्कर, बांधकाम सभापतीपदी रोहन खेडेकर, तर महिला व बालकल्याण उपसभापतीपदी सौ. मनीषा जामसंडेकर यांची बिनविरोध निवड जाहीर झाली.
भाजपकडून संबंधित सर्व पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. अर्जांची छाननी पूर्ण करून नामनिर्देशन निश्चित ठरवण्यात आले. त्यानंतर निवडणूक निर्णय सहाय्यक अधिकारी गौरी पाटील यांनी अधिकृतरीत्या विषय समिती सभापती व उपसभापतींच्या निवडी जाहीर केल्या.
या प्रसंगी नगराध्यक्षा साक्षी प्रभू, भाजप गटनेते शरद ठूकरूल, उपनगराध्यक्षा मिताली सावंत यांच्यासह नगरसेवक चंद्रकांत कावले, नगरसेविका प्रणाली माने, स्वरा कावले, आद्या गुमास्ते, रुचाली पाटकर, संतोष तारी आदी उपस्थित होते.
निवड जाहीर होताच भाजपचे तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, जिल्हा नेते बाळा खडपे, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर, तसेच दयानंद पाटील, वैभव करंगुटकर, महेश जंगले, मनस्वी घारे, प्राजक्ता घाडी, उल्हास मणचेकर, विजय कदम यांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींचे अभिनंदन केले.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते नामनिर्देशन निश्चिती व अंतिम निवड जाहीर होईपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया नियमानुसार पार पडल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. भाजपच्या या यशामुळे देवगड–जामसंडे नगरपंचायतीतील विषय समित्यांवर पक्षाची पकड अधिक भक्कम झाल्याचे चित्र आहे.कोकणशाही देवगड








