देवगड,
मालवण रस्त्यावर आचरा येथे असलेल्या सचिन राणे यांच्या वडापावच्या टपरीला आग लागून हजारो रूपयांचे नुकसान झाले. ही घटना आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत टपरीसह आतमधील सर्व सामान, फ्रिज, पेटीतील पैसे जळून खाक झाले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी धाव घेत आतील गॅस सिलिंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. याबाबत माहितीमिळताच आचरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर,उपाध्यक्ष परेश सावंत, सचिव पंकज आचरेकर, माजी उपाध्यक्ष,जुबेर काझी यांनी भेट देऊन पाहणी केली होती. खबर मिळताच आचरा पोलीसांनीही घटनास्थळी धाव घेतली.









