महायुती सरकार कोकणच्या विकासाचा अनुशेष (बॅकलॉग) भरून काढल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणकेश्वर येथे दिली.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथमच महाशिवरात्री यात्रोत्सवानिमित्त बुधवारी श्रीक्षेत्र कुणकेश्वर येथे
आले. यावेळी त्यांनी कुणकेश्वराची विधिवत पूजा करून दर्शन घेतले. त्यांच्यासमवेत आमदार नीलेश राणे, आ. किरण ऊर्फ भैया सामंत, रवींद्र फाटक, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, तालुकाप्रमुख विलास साळसकर आदी उपस्थित होते.
कुणकेश्वराचे दर्शन झाल्यानंतर देवस्थान ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष एकनाथ तेली यांनी ना. एकनाथ शिंदे
यांचे स्वागत व सत्कार केला. खासदार नारायण राणे, सौ. नीलमताई राणे, पालकमंत्री नितेश राणे उपस्थित होते. यावेळी बोलताना ना. शिंदे यांनी कुणकेश्वर दर्शनाची अनेक वर्षांची इच्छा होती. परंतु, हा योग आज आला. कुणकेश्वर दर्शनाने आपली इच्छा पूर्ण झाली. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. यामुळे या भूमीतील सण, कोकण विकासाचा अनुशेष भरून काढणार.









