मोटरसायकल वरचा ताबा सुटल्याने अपघात युवक ठार…

कणकवली :

कसाल ते कणकवली असा प्रवास करताना ताबा सुटल्याने मोटरसायकल थेट दुकानात घुसली. या अपघातात कुडाळ – गावराई भोगलेवाडी येथील चिंतामणी रवींद्र मेस्त्री (२६) हा युवक ठार झाला. हा अपघात बुधवारी रात्री ११.४५ वा. च्या सुमारास झाला. अपघाताची खबर चिंतामणी मेस्त्री
चिंतामणी मेस्त्री याचे नांदगाव-वाघाचीवाडी येथील मामा दीपक मेस्त्री यांनी कणकवली पोलिसात दिली.
चिंतामणी हा कणकवलीतील एका खाजगी कंपनीच्या ऑफिसमध्ये कुरिअर बॉय म्हणून काम करत होता. त्याचे मामा दीपक मेस्त्री यांना बुधवारी रात्री ११.४५ वा. च्या सुमारास शिवाजी तावडे यांनी फोन करून या अपघाताची माहिती दिली. वागदे नाईक पेट्रोलपंपासमोरील रमेश काणेकर यांच्या दुकानात मोटरसायकल घुसून चिंतामणी हा जखमी झाला असून त्याला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. यानंतर दीपक मेस्त्री हे पुतण्या प्रकाश मेस्त्रीसह उपजिल्हा रुग्णालयात पोहोचले. त्यावेळी डॉक्टरांनी जखमी चिंतामणी मेस्त्री याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर मामा दीपक मेस्त्री यांनी वागदे येथे अपघातस्थळी जावून पाहणी केली व त्यानंतर याची माहिती कणकवली पोलिसांना दिली.