शिरवंडे हिवाळे रोडचे खड्डे बुजवण्याचे काम तात्काळ चालू लोकांची काम आपल्या हातून घडावी हा फक्त राणे साहेबांचा आशीर्वाद… युवा नेते भाजप रघु गावकर यांचे वक्तव्य
शिरवंडे हॉस्पिटल ते हिवाळे हायस्कूल हा रोड गेली कित्येक वर्ष खराब परिस्थितीमध्ये आहे वाहनांना ये जा करण्यासाठी खूप मोठी अडचण या रस्त्यामुळे निर्माण झालेली आहे.. रस्त्याला पडलेले मोठमोठे खड्डे आणि वाहनांना होणारे अडचण लक्षात घेता. तेथील ग्रामस्थांनी युवा नेते भाजप रघु गावकर यांच्याकडे प्रस्ताव दिला. 3फेब्रुवारी रोजी गावातील ग्रामस्थ पंढरपूर वारीसाठी निघणार होते या निमित्ताने एस टी बस या मार्गवरून प्रवास करणार असा ग्रामस्तानी युवा नेते भाजप रघु गांवकर यांच्या कानावर ही गोष्टी घालताच तात्काळ रघु गांवकर यांनी स्वखर्चातून या मार्गावरचे मोठे खड्डे बुजवण्यासाठी jcb पाठवून देऊन काम सुरु केले.ग्रामस्थानी रघु गांवकर आणि राणे साहेबांचे मोठे आभार मानले.. त्यावेळी आमच्या हातून काम होणं हे मा.नारायणराव राणे, आमदार निलेश राणे. पालकमंत्री नितेश राणे अर्थात राणे साहेबांचे आशीर्वाद असल्याचा रघु गावकर यांनी वक्तव्य केला. यावेळी रघु गावकर यांनी स्वतः उपस्थित राहून कामाची पाहणी केली. यावेळी सुरेश गावकर रमेश गावकर नारायण गावकर लक्ष्मण गावकर प्रदीप घाडी गावकर नितेश गांवकर आणि अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.










