Category बातम्या

अखेर शंभूगिरी मठ थांब्याला मान्यता

भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते निलेश तेंडुलकर यांच्या प्रयत्नाला यशकुडाळ : कुडाळ केळुस एसटी प्रवासी मार्गावरील तेंडोली चिखलोण वाडीतून नदीच्या पलीकडे जाण्यासाठी साकव बांधण्यात आला आहे त्याचा फायदा मुननकर वाडी,मांजरेकर वाडी,बागलाची राय, आवेरे या ठिकाणी जाणाऱ्या ग्रामस्थांना होत आहे. परंतु साकवाजवळ एसटी…

सावंतवाडीतील भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची भेट घेऊन केला विशेष सन्मान

सावंतवाडी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीने दणदणीत विजय मिळवला. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा भाजप पदाधिकाऱ्यांनी विशेष सन्मान केला. सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, नवनिर्वाचित जि. प. सदस्य संदीप गावडे,…

केळूस हायस्कूलमधील विद्यार्थ्यांचे ग्लोबल फाउंडेशनकडून शिष्यवृत्ती प्रदान

कुडाळ : ग्लोबल फाउंडेशन पिंगुळी या सेवाभावी संस्थेमार्फत स.का. पाटील विद्यामंदिर केळूसमधील गुणवंत ,होतकरू व गरजूnविद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. या शिष्यवृत्ती अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यास ३ हजार ६०० रुपये एवढी आर्थिक मदत देण्यात आली. या शिष्यवृत्तीचे लाभार्थी हर्ष राजन केळुसकर, भिकाजी…

कोकणात ऐतिहासिक जल्लोष! समुद्रकिनारी पहिलाच मराठी चित्रपट महोत्सव

पालघर शिरगाव : प्रतिनिधी कोकण किनाऱ्यावर यंदा सांस्कृतिक इतिहास घडणार असून १८ ते २२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान शिरगाव बीच येथे आयोजित १२ वा ग्लोबल कोकण महोत्सव अनेक वैशिष्ट्यांनी सज्ज झाला आहे. यावर्षी प्रथमच समुद्रकिनाऱ्यावर मराठी चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येत…

जिल्हा नियोजनची सभा गाजली ; ते “रेफर” प्रकरण आलं समोर ; पालकमंत्री नितेश राणेंनी जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले स्पष्ट निर्देश

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा नियोजन समितीच्या सभेत एका गंभीर रेफर प्रकरणावर जोरदार चर्चा होऊन वातावरण तापले. ट्युमर असलेल्या एका महिलेला “हाय रिस्क प्रेग्नंसी” म्हणून जिल्ह्याबाहेर रेफर करण्यात आल्याच्या प्रकारावर पालकमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकरणात त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन तसेच जिल्हा…

भराडी देवी जत्रोत्सवात RTO कडून रस्ता सुरक्षेचा अनोखा उपक्रम

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री भराडी देवीच्या जत्रोत्सवानिमित्त उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्यावतीने रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. जत्रोत्सवासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व शिस्तबद्ध व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला…

मतदानाचा हक्क बजावत ; मतदान करूनच कुडाळमधील नववधू चढली बोहल्यावर

कुडाळ : लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदान किती महत्त्वाचे आहे, याचे प्रेरणादायी उदाहरण कुडाळ तालुक्यातील तेंडोली–आदोसेवाडी येथील अंजली राऊळ यांनी समाजासमोर ठेवले आहे. आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा दिवस असलेल्या लग्नाच्या दिवशीही त्यांनी मतदानाला प्राधान्य देत ‘आधी मतदान, मग लग्न’ हा संदेश कृतीतून दिला.…

महाराष्ट्रासह कोकणाच्या विकासासाठी ठोस पाऊल; मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश

काजू उद्योग विकासाबाबत शासन निर्णय जाहीर मंत्रालय, मुंबई — राज्यातील काजू लागवड, उत्पादन व प्रक्रिया उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी माननीय मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री यांना सादर केलेल्या पत्राच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून यासंदर्भात आज शासन निर्णय जाहीर करण्यात…

पावशी जि. प. मतदारसंघात दादा साईल विरुद्ध अमरसेन सावंत । सत्ताधारी ताकदीचे पारडे जड

पावशी जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणूक यावेळी अत्यंत लक्षवेधी ठरली आहे. महायुतीकडून तुकाराम उर्फ दादा साईल रिंगणात असून, त्यांच्या विरोधात उबाठा सेनेचे अमरसेन सावंत हे मुख्य प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून मैदानात उतरले आहेत. ही लढत केवळ उमेदवारांपुरती मर्यादित न राहता, सत्ताधारी विकासवादी…

माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघात रुपेश कानडे अंतिम प्रचारात आघाडीवर

कुडाळ तालुक्यातील माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक यावेळी विशेष चर्चेत आहे. महायुतीकडून रुपेश कानडे रिंगणात उतरले असून, त्यांच्या विरोधात काही अपक्ष उमेदवार उभे आहेत. मात्र या लढतीत उबाठा सेनेचे रमाकांत ताम्हणेकर हेच कानडे यांचे मुख्य प्रतिस्पर्धी उमेदवार मानले जात आहेत.…