Category बातम्या

🍀 रानभाज्यांच्या चवीसोबत आरोग्याचे महत्त्वही सांगणार; वेंगुर्त्यात ‘उत्सव रानभाज्यांचा’

वेंगुर्ले : माझा वेंगुर्ले, इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ले आणि हिरकणी महिला शहरस्तर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विशाल परब पुरस्कृत उत्सव रानभाज्यांचा २०२६ अंतर्गत रानभाजी पाककला स्पर्धा व प्रदर्शन’ रविवार ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजल्यापासून सिद्धिविनायक मंगल कार्यालय, भटवाडी, वेंगुर्ले…

सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवरील CRZ प्रश्न ऐरणीवर; आमदार निलेश राणे व मंत्री नितेश राणेंनी घेतली मंत्रालयात बैठक

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीवरील CRZ (Coastal Regulation Zone) संदर्भात तसेच NCLT मध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणाबाबत मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी मंत्रालयात बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी मालवण शहर व परिसरातील विविध विकासकामे तसेच प्रलंबित…

🌿 गणेश चतुर्थीपूर्वी आंबा-काजूची नुकसानभरपाई द्या; शिवसेनेचा तहसीलदारांना इशारा!

सावंतवाडी : शासनाने आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाई मंजूर केली असली, तरी गणेश चतुर्थीपूर्वी ही भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी ठाम मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली आहे. सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मंजूर झालेल्या मदतीसाठी प्रतीक्षा करायला लावू नका, अशी भूमिका…

🐕 मालवणात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

मालवण : शहरात दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून नागरिकांच्या, लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. कुत्र्यांच्या नियमित, योग्य नसबंदीचा अभाव, वाढते हत्ते, शासकीय रुग्णालयातील रेबीज प्रतिबंधक लसींचा तुटवडा याविरोधात मनसेनेतर्फे आक्रमक भूमिका घेण्यात आली. मालवण पालिकेला याबाबत निवेदन…

नादब्रह्म संगीत विद्यालयाचा ‘स्वर पौर्णिमा’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

संजय पेटकर / कोकणशाही कणकवली : नादब्रह्म संगीत विद्यालयाच्या शिष्यवर्गातर्फे आयोजित करण्यात आलेला ‘स्वर पौर्णिमा’ हा सांगीतिक कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध गीत, शास्त्रीय संगीत व सांगीतिक रचनांचे उत्तम सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली.कार्यक्रमाला प्रमुख…

🚨 डिजिटल सुविधेच्या नावाखाली प्रवाशांचा खोळंबा; NCMC कार्ड वितरणात गोंधळ!

सावंतवाडी : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस प्रवासासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करत सुरू करण्यात आलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) वितरण आणि नोंदणी प्रक्रियेत सध्या प्रचंड सावळागोंधळ पाहायला मिळत आहे. स्मार्ट कार्ड वितरणातील ढिसाळ नियोजनामुळे प्रवाशांचा खोळंबा होत असून,…

⚡ गणेशोत्सवात वीज तोडणी नको!; बांधकाम सभापतींच्या महावितरणला स्पष्ट सूचना

सिंधुदुर्ग : गणेशोत्सव तोंडावर आला आहे. या पार्श्वभूमीवर थकीत बिलांच्या कारणांनी वीज कनेक्शन तोडू नये, अशा सूचना जिल्हा परिषदेचे बांधकाम व वित्त सभापती संतोष साठविलकर यांनी वीज महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना केले आहेत.ज्यांची वीज बिल भरलेले नाही अशा वीज ग्राहकांचे घरगुती…

🚔 आजीच्या गळ्यातील सोन्याच्या चैनवर डल्ला; आरोपी डोंबिवलीत पोलिसांच्या जाळ्यात!

संजय पेटकर / कोकणशाही कणकवली – देवगड : शिरगाव-साटमवाडी येथे वयस्कर महिलेच्या गळ्यातील १ लाख ७५ हजार रुपये किमतीची सोन्याची माळ हिसकावून पळून गेलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्गच्या पथकाने डोंबिवली येथून शिताफीने जेरबंद केले. तन्मय राजेंद्र साटम (वय…

🔴 एका स्मृतीला मानवंदना… वेंगुर्ल्यात ६ सप्टेंबरला रक्तदान शिबिर

वेंगुर्ले : कै. सौ. महानंदा उर्फ सुनंदा शामप्रसाद गुरव यांच्या प्रथम स्मृतीदिनाचे औचित्य साधून गुरव कुटुंबीय व मित्र परिवाराच्या वतीने वेंगुर्ले येथे रविवार, ६ सप्टेंबर ला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर शहरातील पू. प्रा. शाळा वेंगुर्ला…

सिंधुदुर्गसह १२ जि.प.चे ७०० कोटी पाण्यात; निधी परत जाण्याने विकासकामांना ब्रेक

नाशिक : निधी वितरणासाठी शासनाने लादलेली ‘व्हीपीडीए’ ही डिजिटल आर्थिक प्रणाली जिल्हा परिषदांच्या गळ्याचा फास ठरली आहे. या प्रणालीमुळे राज्यभरात सिंधुदुर्गसह सुमारे १२ जिल्हा परिषदांचा तब्बल ७०० कोटींहून अधिक निधी खर्च करण्यात न आल्याने शासनाकडे परत गेला आहे. यात काही…