Category बातम्या

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध विकास कामांचा आढावा

• स्थानिक अडचणी सोडविण्यासाठी संयुक्त बैठका घेण्याचे निर्देश • सर्व कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा • कामात हयगय करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाईचे निर्देश

ऑनलाइन जुगार, मटका आणि गेमिंगवर कारवाईचा बडगा; मंत्रालयात पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थित आढावा बैठक

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सायबर पोलीस स्टेशन व जिल्हा पोलीस दलाच्या सायबर गुन्हे प्रतिबंधक कामकाजाच्या अनुषंगाने आज मंत्रालयात मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थित आढावा बैठक पार पडली. ऑनलाइन गेमिंग, मटका, जुगार तसेच इतर अवैध सायबर स्वरूपाच्या कृत्यांवर…

कोकणाला मिळणार हवाई झेप! पालकमंत्री नितेश राणेंच्या मार्गदर्शनाखाली कोकणासाठी विमानसेवेच्या नव्या संधी

गणेशोत्सवात कोकणवासीयांची गैरसोय टळणार; नवी मुंबई–चिपी मार्गावर वाढीव उड्डाणांची तयारी कोकणातील हवाई संपर्क अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई-चिपी विमानसेवा स्वातंत्र्यदिनापूर्वी सुरू करण्याबाबत तसेच आगामी गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त उड्डाणांची व्यवस्था करण्यासंदर्भात मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली…

सिंधुदुर्गला ‘आरोग्यसंपन्न जिल्हा’ बनवण्याचा निर्धार; पालकमंत्री नितेश राणेंच्या बैठकीत महत्त्वाचे निर्देश

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि.१८ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्हास्तरीय जिल्हा आरोग्य संपन्न गाव अभियान समितीची मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थित मंत्रालयात बैठक पार पडली. जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य अभियानांचा बैठकीत आढावा घेत पालकमंत्र्यांनी…

सिंधुदुर्गच्या विकासकामांवर पालकमंत्री नितेश राणेंची कडक नजर; प्रलंबित कामांबाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पत्तन विभागाच्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थित मंत्रालयातील दालनात घेण्यात आला. दिनांक ३ जून २०२६ रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशांनुसार संबंधित विभागांकडून सद्यस्थितीतील कामांचा आढावा…

सांगलीतील विद्यार्थ्यांसाठी धावले आमदार निलेश राणे; 3 वर्षांचा बसथांबा प्रश्न अखेर मार्गी!

सावंतवाडी : जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मतदारसंघाच्या सीमांचे बंधन न मानणारे नेतृत्व म्हणून आमदार निलेश राणे यांची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. सांगली जिल्ह्यातील हणमंतवडिये येथील शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित असलेला एस.टी. बसथांब्याचा प्रश्न तब्बल तीन वर्षांपासून प्रलंबित होता. या प्रश्नामुळे…

भरती प्रक्रियेत कोकणवासीयांना धक्का; मुलाखतींचे ठिकाण ठरले वादाचे कारण

चिपळूण : कोकण रेल्वेच्या १३२ पदांच्या भरती प्रक्रियेसाठीच्या मुलाखती चक्क आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वे प्रशासनाच्या या अजब आणि अनपेक्षित निर्णयाला कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीने तीव्र विरोध दर्शविला आहे. समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी…

फिटनेसची रविवारी धमाकेदार सुरुवात! सावंतवाडीत ‘संडे ऑन सायकल’ अभियानाला भरघोस प्रतिसाद

सावंतवाडी : भारत सरकारच्या’फिट इंडिया मिशन’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘संडे ऑन सायकल’ अभियानाला सावंतवाडीत प्रतिसाद लाभला. पंचायत समितीतर्फे आयोजित या उपक्रमात सायकलिंग व धावण्याद्वारे नागरिकांना तंदुरुस्त जीवनशैलीचा संदेश देण्यात आला. या अभियानाची सुरुवात तालुका स्कूल क्रमांक १ येथून सभापती सुस्मिता…

सिंधुदुर्गसह 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा!

मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. हवामान विभागाने याबाबत अधिकृतपणे घोषणा केली आहे. तळकोकणात पावसाने रात्री किनारपट्टी भागात जोरदार हजेरी लावली. सकाळी जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाच्या मध्यम सरी बरसल्या. सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळला. सध्या जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ…

मुंबई-गोवा वंदे भारतला ब्रेक! आता दररोज नाही, आठवड्यात फक्त 3 दिवस धावणार

कोकण रेल्वेवर वंदे भारत ट्रेनची मागणी दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. यातच फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. कारण जाणून घ्या… वंदे भारत एक्स्प्रेसलाही कोकण रेल्वेवरील मान्सून वेळापत्रकाचा फटका बसला आहे. आठवड्यातून सहा वेळा धावणारी वंदे भारत आता मान्सून वेळापत्रकानुसार फक्त…